
आवकाशात १४ जुलै ते ४ ऑगस्ट पर्यंत दिसणारा निओवाईज धुमकेतू
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
अवकाशात १४ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी सहा ते रात्रौ साडेनऊ या दरम्यान दिसणारा हा निओवाईज धूमकेतू पाहण्याची अनोखी संधी पृथ्वीवरील सर्वांना लाभणार आहे. सुर्यास्तानंतर १४ जुलैपासून ४ ऑगस्टपर्यंतचे 20 दिवस उत्तर - पश्चिमेच्या आकाशात हा धूमकेतू पाहता येणार आहे अशी खगोलीयन माहिती पुणे येथील ग्लोबल मिशन अॅस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी दिली.
सध्या डोळ्यातून दिसणारा धूमकेतू म्हणजे काय ? धूमकेतू हे आपल्या सूर्यमालेचेच घटक असून. धूमकेतूंचा आकार ओबडधोबड आहे तसेच त्यात धूळ, बर्फ, वायू यांचा समावेश असतो. १९९७ साली आलेला हेल-बॉप हा धूमकेतू सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला होता. त्यानंतर २००७ मध्ये मॅकनॉट नावाचा धूमकेतू पृथ्वीवरून दिसला होता. त्यानंतर साध्या डोळ्यांनी दिसणारा हा निओवाईज धूमकेतू आता १४ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत पाहता येणार आहे. तसेच त्यांचा आकार काही किलोमीटरपर्यंत पसरलेला असतो. त्यांच्या कक्षेत फिरत-फिरत ते सुर्याजवळून प्रवास करतात. यावेळी सुर्याच्या प्रखरतेमुळे त्यांच्यातील बर्फ वितळतो.यामुळे पृथ्वीवरून पाहताना त्यांची शेपटी दिसते. ही शेपटी दोन भागात विभागलेली असते. एक शेपटी धुलिकणांची असते तर दुसरी वायूंची असते. पृथ्वीजवळून जाताना या धूमकेतूंच्या धुलिकणांमुळे उल्कावर्षाव झालेला पाहायला मिळतो. सुर्यमालेत हे धूमकेतू आपापल्या कक्षेत सुर्याला प्रदक्षिणा घालत असतात, अशी विशेष माहिती कुंभारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
निओवाईज धूमकेतूचा शोध कधी लागला ? या धूमकेतूचा शोधचालू
वर्षातील २७ मार्च २०२० रोजी लागला आहे व नासाने या धूमकेतूविषयी आपल्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती दिली आहे.२७ मार्चला हा धूमकेतू सुर्याजवळून जाताना नासाच्या निअर अर्थ ऑब्जेक्ट वाईल्ड फिल्ड इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोरर’ (निओवाईज) या स्पेस टेलिस्कोपने या धूमकेतूचा शोध लावला. याचा खगोलीय भाषेतील क्रमांक हा C/२०२० F३ आहे.तसेच हा धूमकेतू पृथ्वीपासून सर्वांत कमी अंतरावरून म्हणजेच १० कोटी ३० लाख किलोमीटर वरून प्रवास करतो आहे. त्याचा आकार पाच किलोमीटर इतका मोठा आहे. आपल्या सौरमालेच्या निर्मितीवेळीच या धूमकेतूची निर्मिती झाली आहे.” असे दिलेल्या माहीत म्हटले आहे,
अवकाश प्रेमींसह सर्वानाचं हा धूमकेतू पाहता येईल?
हा धूमकेतू सायंकाळी ६ नंतर रात्री साडेनऊपर्यंत पाहता येईल. आकाश स्वच्छ असेल तर तो भारतातून सगळीकडून दिसेल. जेवढा तो उशिरा पाहायला जाऊ तेवढा तो अंधुक होत जाईल. १९९७ साली आलेल्या हेल-बॉप धूमकेतूएवढा तो तेजस्वी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या धूमकेतूच्या दोन्ही शेपट्या दिसत आहेत. या धूमकेतूची कक्षा मोठी म्हणजे साडेसहा हजार वर्षांची असल्याने तो इथून पुढे थेट इ. सन. ८००० नंतरच पृथ्वीवरून दिसू शकेल.” त्यामुळे नवा पाहुणा पहाण्यासाठी हि आपल्यासाठी एकमेक सुवर्ण संधी आहे असे म्हटले आहे,
नासाने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, निओवाईज धूमकेतूला दोन शेपट्या आहेत. या धूमकेतूच्या खालच्या शेपटीत मोठ्या प्रमाणात धूळ आणि बर्फ आहे. सुर्याजवळ येत असल्याने धूमकेतूच्या केंद्र भागाचे तापमान वाढते आणि त्यातली धूळ आणि वितळलेल्या बर्फामुळे ही मागे जाणारी शेपटी तयार होते.या धूमकेतूच्या दुसऱ्या शेपटीत वायूंचं आणि आयनचं प्रमाण अधिक आहे. सुर्याच्या प्रखर प्रकाशामुळे या वायूंमधले इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. त्यामुळेच या दुसऱ्दुसऱ्या
शेपटीची निर्मिती झाली आहे. धूमकेतूची शेपटी लाखो किलोमीटरवर पसरलेली असल्याने
आपल्या सुर्यमालेला अचानक भेट देणाऱ्या अनेक अवकाश्यस्थ वस्तू आहेत. त्यात धूमकेतूचे विशेष आकर्षण असते. जगभरातील खगोलप्रेमी निओवाईज धुमकेतू दिसण्याची वाट पाहत आहेत तर काहींना याचे दर्शन देखील झाले आहे सध्या देशात मान्सूनचं आगमन झाल्याने निरभ्र आकाश सापडणं दुर्मिळ आहे. या २० दिवसानंतर पुढची काही हजार वर्षं हा धूमकेतू दिसणार नाही. मात्र, ही संधी निसर्गाने उपलब्ध करून दिली तर हा दुर्मिळ धूमकेतू पाहण्याची संधी सोडू नका तर ते आवर्जून उघड्या डोळ्याने पहा असे विशाल कुंभारे यांनी आवाहन केले आहे.






Be First to Comment