Press "Enter" to skip to content

शिवसेना शाखा केळवणे जिल्हा परिषद आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

८० रक्तदात्यांनी केले रक्तदान

सिटी बेल । केळवणे । अजय शिवकर ।

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला आहे ,त्यात राज्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. वाढती कोरोना रूग्णांची संख्या व त्यांना कमी पडणारा रक्तपुरवठा लक्षात घेता पनवेल तालुक्यातील शिवसेना केळवणे जिल्हा परिषद आयोजित सध्या कोव्हीड रुग्णांना, रक्तपुरवठा कमी पडू नये म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन, रक्तदान करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले होते. राज्यभरातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी शासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे रक्तपेढयांमधील रक्ताचा पुरवठा कमी होणार आहे. यामुळे अनेक रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासणार असल्याने, मुख्यमंत्री उसद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहाना नुसार व जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या आदेशानुसार शिवसेना पनवेल तालुक्याच्या केळवणे जिल्हा परिषदेच्या वतीने केळवणे ग्रामपंचायत कार्यालय येथे रविवार दिनांक २५ एप्रिल रोजी शासनाच्या नियमानुसार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

एम.जी.एम हाॕस्पिटल कामोठे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातील डाँ. विनिता राव,डाँ. करिश्मा पाटील ,उमा संतोष घोरपडे,अवंतिका खोत, दिपाली चव्हाण, माधुरी पाटील ,राजेश आतरडे,मनोज जाधव,दिपक ठोकल,दिप्ती यादव यांनी आपले बहुमुल्य सहकार्य दिले.

सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच विभाग प्रमुख डाँ .भरत जे.घरत,शाखा प्रमुख मारूती मोकल,सरपंच अश्विनीताई घरत, उपशाखा प्रमुख विजय कोळी ,प्रकाश पाटील ,निलम पाटील ,ग्रा.पं स. गुरूदास ठाकुर ,जयश्री कोळी ,पनवेल तालुका युवा उपाध्यक्ष विक्रांत घरत,विभाग अधिकारी स्वप्निल भोवड, संदीप घरत,विनोद ठाकुर तानाजी कोळी आदि मान्यवरांनी उपस्थिती दाखवून व कार्यक्रमात सहकार्य करून शोभा वाढविली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.