कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे येथे बेंच ( खुर्ची ) आणि आकर्षक टेबलची सोय
सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोंनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे येथे अजित पाटील यांनी आपला मुलगा रेयांश याच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या योगदानातून बेंच व टेबलची सोय करण्यात आली आहे.
समाजकार्य करावं तेही निस्वार्थ भावनेतून मग ते कार्य कोणतंही असो आपलं योगदान हे १०० टक्केच असावं अशी महत्वकांक्षा बाळगणारी माणसं पण या जगात पहावयास मिळतात आणि ती पण हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असतात. असंच समाजहिताच कार्य आपल्या हातून घडावं हीच उदात्त भावना मनात बाळगून आपल्या मुलाच्या चि.रेयांश यांच्या जन्मदिवसाच औचित्य साधत खोपटे गावचे सामाजिक कार्यकर्ते अजित मधुकर पाटील यांनी सामाजिक कार्यात आपलं योगदान लागावं म्हणून सारडे विकास मंच या सामाजिक संस्थेच्या कार्यावर विश्वास ठेऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नागेंद्र जी. म्हात्रे यांच्याकडे २००० (दोन हजार ) रुपयांचामदत निधी सामाजिक कार्याकरीता सुपूर्द केले होता.
त्या मदतनिधीचा आज खऱ्या अर्थानं एका सुंदर कार्याकरीता योग्य तो सदुपयोग केला गेला आहे. सारडे विकास मंचच्यां सहकाऱ्यांनी देखील आपला स्वतःचा पदरमोड करत आणखी एका नव्या कल्पनेच्या कल्पकतेने वेस्ट लाकडी पॅलेट आणि स्टील पाईपच्या सुंदर निर्मितीतून एक आकर्षक असं बेंच ( खुर्ची )आणि टेबल तयार करून कोमनादेवी ऑक्सिजन पार्क परिसरामध्ये मध्ये येणाऱ्या पर्यटक व वाटसरुं करीता क्षणभर विश्रांती व आराम करण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सारडे विकास मंचचे नागेंद्रजी म्हात्रे आणि रोहित पाटील व स्नेहा पाटील या दाम्पत्याच्या परिश्रमाने आणि कल्पनेने सोबतच राजू मुंबईकर, संपेश पाटील, रोशन पाटील, अनिल घरत, कांतीलाल म्हात्रे, नवनीत पाटील, निवास गावंड सर, कौशिक ठाकुर सर, स्नेहाताई रोहीत पाटील, रूपालीताई म्हात्रे, रिया म्हात्रे रुद्र, दानिश, श्रीवेद,जय,स्नेहित ,तर खोदकाम भावज्या यांच्या सहकार्याने आणि वेल्डिंगचं काम अगदी मोफत करत आपल्या मनाचा मोठेपणा दर्शविला तो प्रितेश म्हात्रे यांनी एक सुंदर अशी बसायची व्यवस्था करण्यात आली.
नक्कीच ह्या बेंच ( खुर्ची ) टेबलचा उपयोग येथे येणाऱ्या वाटसरूनां आणि आजूबाजूच्या परिसरातुन येणाऱ्या पर्यटकांना त्या निसर्गाच्या सानिध्यात क्षणभर विश्रांती घेण्याचं आत्मिक सुख देईल एवढं मात्र नक्की.
Be First to Comment