Press "Enter" to skip to content

आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णायलाची केली पाहणी

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्वरित उपाययोजना म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णलयातील सर्व सुविधांची पाहणी केली विशेषतः ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची पाहणी केली. यावेळी उपास्थित सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

रुग्णालयातील समस्यांची माहिती घेतली व यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले. कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची गैरसोय होता कामा नये या दृष्टीने कर्जत उपजिल्हा रुग्णालय कमी पडता कामा नये असे संकेत यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले.
या वेळी तहसिलदार विक्रम देशमुख, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील, वैद्यकीय अधिकारी मनोज बनसोडे, डॉ.घनश्याम नाझिरकर, नगरसेवक संकेत भासे, माजी उपशहर प्रमुख अभिषेक सुर्वे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.