सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
कोकण एज्यकेशन सोसायटीच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात रसायन शास्त्र विभागात कार्यरत असलेले सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण दिगंबर तुपारे यांना विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतंर्गत पी. एच. डी अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे.
डॉ. तुपारे गेली २२ वर्ष येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यांनी त्यांच्या या दिर्घ कारकिर्दीत नेट, सेट, परीक्षा व एम. फिल आणी पी. एच. डी अभ्यासक्रम पुर्ण केले आहेत. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय नियतकालिकेतून त्यांनी अठरा संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत. तसेच त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषेदेत भाग घेऊन संशोधन निबंधांचे वाचन, मुंबई विद्यापीठाचे चार लघुप्रकल्प पुर्ण केले आहेत. तसेच यांनी एक आंतरराष्ट्रीय पातळीवर पुस्तक प्रकाशित झाले केले आहे.
याशिवाय त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून ४ वर्ष रायगड जिल्हा विभागिय समन्वयक व १४ वर्ष रा. से. यो कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. या कामाची पोचपावती म्हणून त्यांना विद्यापीठ स्तरावर उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी व उत्कृष्ट विभागिय समन्वयक व इतर सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. विविध विषयावर लिहिलेले सामाजिक लेख कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विकास अंक, दै. क्रषीवल, दै.कुलाबा दर्पण, सा. वार्तादीप व दै. नवे शहर आदी दैनिकांत मध्ये प्रसिध्द झाले आहेत.
२०१८ या शैक्षणिक वर्षात त्यांना मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली व २०२१ रोजी त्यांना महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या संशोधन प्रयोगशाळेत पी. एच. डी साठी विद्यार्थी घेण्यास विद्यापीठाने पत्रान्वे मान्यता दिली आहे. नुकतीच पेट परीक्षा पास झालेले विद्यार्थी व अन्य नेट सेट पास विद्यार्थी नावनोंदनी साठी अर्ज करू शकतात. या सर्व यशाचे श्रेय त्यांनी संस्थेचे अध्यक्ष मा. संजयभाई पाटील, सचिव मा. अजितभाई शहा, कार्यकारी अधिकारी मा. विनायक खोपकर, प्राचार्य डॉ. संदेश गुरव, प्राचार्य डॉ. धनाजी गुरव, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक मा डॉ. सुनिल पाटील, तसेच विभाग प्रमुख मा. डॉ. दिनेश भगत, सी. एस. आय. आर लँब हैद्राबाद चे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सिद्धनाथ भोसलेे, पत्नी सौ. मिनाक्षी तुपारे व सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले आहे. त्यांच्या पाठींब्यामुळे व आई वडिलांच्या आशिर्वादाने हे यश संपादन करु शकलो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.








Be First to Comment