सिटी बेल लाइव्ह / पेण(प्रशांत पोतदार)
पेण तालुक्यातिल ग्रामीण तसेच शहरी भगात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास कोरोनाचा संसर्ग होत असल्याने पेण तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांनी मनसे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांच्या शिकवणूकी प्रमाणे पेण मधील गोर गरिब नागरीकांना मदतीचा हात दिला.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एक लाख रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप हि याआधी रुपेश पाटील यांच्या कडून करण्यात आले तर पेण मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुपेश पाटील यांनी पुजा मेडिकलचे मालक मिभराम मालविया यांच्या सहकार्याने पेण शहरात रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.पुजा मेडिकलचे मालक मालविया यांनी लॉक डाऊन काळात वाहतुक पोलिस स्टाफ यांना मास्क तसेच सेनिटायझरचे वाटप केले होते.






Be First to Comment