Press "Enter" to skip to content

देविच्यापाड्यात कोविड रुग्णालय सुरू


देवीच्यापाड्यातील कॅलेड्रियस मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल्सला कोविड रुग्णालय म्हणून परवानगी

सिटी बेल । तळोजा । वचन गायकवाड ।

नवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील देविचापाडा गावातील पूर्वी चा जिवनज्योती हाॅस्पीटल आताच कॅलेड्रियस मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल म्हणून ओळखल जातो. हाच हाॅस्पीटल आता कोविड रुग्णालय म्हणून ओळखला जाणार आहे. या हाॅस्पीटलमध्ये 51 बेड व 6 आय.सू.यू उपलब्ध असणार आहेत. 

याच कॅलेड्रियस मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटला नुकताच पनवेल महानगरपालिकेकडून कोविड रुग्णालय म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे.  यामध्ये या हाॅस्पीटला फक्त ऑक्सिजन आणि आय.सी.यू .या दोनच  परवानगी देण्यात आली असून वेटिलेंटर मशीन हाॅस्पीटलमध्ये उपलब्ध नसल्यामुळे वेटिलेंटर  ची परवानगी देण्यात आली नसल्याचे पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त डाके यांनी सांगितले.तसेच वेंटिलेटरचे रूग्ण या हाॅस्पीटल मध्ये ठेवले जाणार नाहीत याची कल्पना हि दिली. परंतू देविच्यापाड्यात कोविड रुग्णालय सुरू झाल्यामुळे गावातील नागरिकांच्या मनात भितीची वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याला हि कोरोनो होईल कि काय हि भिती निर्माण झाली आहे. तर एकिकडे नागरिकांना दिलासा देणारी हि गोष्ट आहे.

देविचापाडा, वावंजे,तोंडरे, डोंगरेचापाडा, पालेखुद॔, शिरवली, महोदर, कुत्तारपाडा, नितळस, घोट, नागझरी, कानपोली, वलप या गावातील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी आता पनवेला किंवा पनवेलच्या जिल्हा रुग्णालयात  जाण्याची गरज लागणार नाही. सध्या पनवेल मध्ये कोविड रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीमध्ये देविच्यापाड्यातील कॅलेड्रियस मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल्सल मध्ये 51 फेड व 6 आय.सि. यू . उपलब्ध आहेत. त्यामुळे पनवेलला जाण्यासाठी लागणारा वेळ हा वाचणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या रूग्णांचा प्राण हि वाचणार आहे. कॅलेड्रियस मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये योग्य तो उपचार कोविड रुग्णांवर केला जाईल. 

या हाॅस्पीटलमध्ये कोविड च्या रूग्णांवरच उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी घाबरू नये. आम्हाला सहकार्य कराव.असे आव्हान या हाॅस्पीटलचे एम.डी. व मालक डाॅक्टर मिनल इनरकर यांनी केल आहे. त्याचबरोबर या परिसरातील जे गरजू आहेत. ज्यांच्याकडे पैशे असून सुद्धा ज्यांना पनवेलमध्ये हाॅस्पीटलमध्ये बेड उपलब्ध होत नाही. अशा रुग्णांना मी माझ्या हाॅस्पीटलमध्ये बेड उपलब्ध करून दिले आहेत.

कोविड च्या रुग्णांना इथून बर करून बाहेर पाठवणे हे आमच कत॔व्य आहे. या हाॅस्पीटलमध्ये कोविडचा रूग्ण बरा होऊनच बाहेर पडेल असा विश्वास डाॅ. मिनल इनरकर यांनी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.