Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागात 251 सक्रीय कोरोनारुग्ण !

मोहोपाडा रिस परिसरात कोरोनाचा फैलाव वेगाने, नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.कोरोनावर उपचार करणा-या रुग्णालयांसमोर बेड शिल्लक नसून रेमडिसीवीर इंजेक्शन चा तुटवडा जाणवत असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असताना नागरिक तरीदेखील अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मुक्तसंचार करताना दिसत आहेत.नागरिकांचा हा बिनधास्तपणा त्यांच्या आरोग्यावर बेतू शकतो.याकरिता सर्वांनी शासन आदेशाचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली होती.यावेली नागरिकांनी शासन आदेशाचे पालन करुन कोरोनाला हरविले होते.तसेच कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेवर विजय मिळवावा.
वासांबे मोहोपाडा कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वाढतच आहे.सध्या वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद
विभागात 23 एप्रिलपर्यंत एकूण 251 रुग्ण सक्रिय असून परिसरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 814 झाली आहे.यात कोरोनावर 530 जणांनी मात केली आहे.तर 33 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.परिसरात मृत्यूदर जरी कमी असला तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन शासनाच्या वतीने होत आहे.

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील कोरोनाग्रस्तांची 23 एप्रिलपर्यंत असलेली गावनिहाय विश्वसनीय आकडेवारी खालीलप्रमाणे

मोहोपाडा –कोरोना सक्रिय रुग्ण संख्या-64,
रिस परिसर-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या -84,
नविन पोसरी-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या-12,
चांभार्लीं-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या -24,
शिवनगर-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या-5,
आली आंबिवली-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या-7,
लोधिवली परिसर-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या-28,
पानशिल-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या-5,
तळेगाव-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या-3,
रिसवाडी-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या -5,
भटवाडी-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या-2,
तळेगाव वाडी-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या-2,
पराडे-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या 01,
खाने आंबिवली-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या-6,
कांबे-कोरोना सक्रिय रुग्ण संख्या-3

दरम्यान 17 एप्रिलपर्यंत चौक मंडलात एकूण 1445 रुग्ण संख्या असून एकूण 55 जण मयत झाले आहेत.खालापूर तालुक्यात वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनारुग्णांची संख्या लक्षणीय असून शासकीय नियमांचे काटेकोर पालन करुन कोरोनाला परिसरातून हद्दपार करावा अशी तज्ञांकडून विनंती होत आहे.

शासनाने 45 वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड लसीकरण सुरु केले आहे तर 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड लस घेता येणार असल्याने सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी विनाकारण बाहेर न फिरता वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुवावेत,सोशल डिस्टिंक्शन पाळावे, मास्कचा वापर करावा ,सॅनिटायझरचा जास्त वापर करावा,असे आवाहन वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत आणि रसायनी पोलिस ठाण्याच्या वतीने होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.