सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)
बलात्कारी नराधमास लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीनविन पनवेल महिला शहर संघटक सौ. अपूर्वा प्रभू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृह मंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना विधानपरिषद उपसभापती आमदार डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या कडे ईमेल द्वारे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, पनवेल येथील इंडिया बुल कोविड क्वारंटाइन सेंटर मध्ये घडलेले बलात्कार प्रकरण हे अत्यंत विकृत, घृणास्पद, तसेच समस्त स्त्री वर्गाला लज्जास्पद आणि अपमानास्पद असे कृत्य असून गंभीर गुन्हा आहे. शिवसेना महिला आघाडी आणि महाराष्ट्रातील तमाम स्त्री वर्गाची हि मागणी आहे की लवकरात लवकर अतिजलद प्रक्रिये द्वारे (फास्ट ट्रॅक) आरोपीला कठोर शासन व्हावे व पीडितेस न्याय मिळावा. तसेच सदर घृणास्पद गुन्ह्याची दखल घेऊन प्रशासनाने आता तरी प्रत्येक क्वारंटाइन सेंटर, कोविड हॉस्पिटल साठी पूर्णवेळ सुरक्षा रक्षकांच्या त्वरित नेमणुका कराव्यात. आमच्या मागण्यांचा ताबडतोब विचार होऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.






Be First to Comment