सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
सुमारे पन्नास कोरोना बाधित उपचार घेत असलेल्या कर्जतच्या उप जिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र असल्याने नागरिक घाबरतच लस घेत असत. ही बाब नगराध्यक्षांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांनी भेट घेऊन लसीकरण केंद्र हलविण्याबाबत चर्चा केली. त्यांनंतर लसीकरण केंद्र रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत हलविण्यात आल्याने लसीकरण करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कर्जत तालुक्यात मागील आठवड्यात पाचशेच्या पुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी पन्नासच्या वर रुग्ण उपजिल्हा रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर उपचार घेत आहेत. या रुग्णांचे नातेवाईक सुद्धा दवाखान्याच्या आवारात असतात. पूर्वी लसीकरण केंद्र पहिल्या मजल्यावर होते. त्यांनतर ते तळमजल्यावर सुरू करण्यात आले. जेष्ठ नागरिकांसाठी लसीकरणं सुरू केले तेंव्हा जास्त गर्दी होत नसे. मात्र 1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली.
याच दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमालीचे वाढले गेल्या आठ दिवसात दररोज रुग्ण वाढीचा उच्चांक झाला तब्बल 509 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने सापडले त्यातील अनेक रुग्ण कर्जत उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी येणारांना मनात भीती वाटत होती. लसीकरण केंद्र हलवावे अशी नागरिकांची मागणी होत होती.
त्या मागणीची दखल घेऊन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नगरसेवक विवेक दांडेकर यांच्यासह रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांची भेट घेऊन लसीकरण केंद्र अन्य ठिकाणी हलविण्याबाबत चर्चा केली. त्यासाठी लागणारी सहकार्य करण्याचा शब्दही जोशी यांनी दिला. भाजप किसन मोर्चाचे जिल्हा संघटक सुनील गोगटे डॉ. बनसोडे यांची भेट घेऊन लसीकरण केंद्र रुग्णालयाच्या अन्य भागात हलवावे असे निवेदन देऊन सांगीतले.
काहींनी जीवन शिक्षण मंदिर मुलांच्या एक नंबर मराठी शाळेत लसीकरण केंद्र न्यावे असेही सांगितले. डॉ. बनसोडे यांनी सर्वाना सोईचे व्हावे यासाठी रुग्णालयाच्या जुन्या रिकाम्या इमारतीत लसीकरण केंद्र हलवून आज पासून सुरू सुद्धा करण्यात आले. सुरक्षित ठिकाणी लसीकरण केंद्र नेल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.








Be First to Comment