Press "Enter" to skip to content

आमदार महेंद्र थोरवे यांच्या कोविड रुग्णालयाच्या मागणीला यश

रायगड हॉस्पिटल लोकांच्या सेवेत रुजू

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल येथे कोविड रुग्णालय म्हणून सुरू केले आहे, आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले.

दिनांक 17 एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत संपूर्ण जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती कशी आहे या बाबत विचार विनिमय करण्यात आला. यात प्रामुख्याने कर्जत मध्ये कोविड रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे असे मत आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडले व जम्बो कोविड रुग्णालयाची मागणी केली. परंतु जो पर्यंत जम्बो कोविड रुग्णालय होत नाही तोपर्यंत रायगड हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी पालकमंत्री आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना आमदार महेंद्र थोरवे यांनी केली. कारण सद्य स्थितीत रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलची व बेडची संख्या कमी असल्या कारणाने रुग्णांची व नातेवाईकांची फरपट होत आहे. आणि याचाच विचार करून आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून व पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज रायगड हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णालय चालू करण्यात आले आहे त्यामुळे याचा फायदा नक्कीच पुढील काळात कर्जत मधील नागरिकांना होईल असे सांगितले.

यावेळी रायगड हॉस्पिटल चेअरमन डॉ. नंदकुमार तासगावकर, डॉ पाणिनी, सुनिल गोगटे, राजेश भगत, नगरसेवक संकेत भासे आदी सह रायगड हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.