सिटी बेल लाइव्ह / उरण (घनश्याम कडू )
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस अधिक वाढू लागला असून,आज नव्याने १६ रुग्ण पॉजेटीव्ह सापडल्याने एकूण रूग्ण संख्या ही ६५७ वर पोहोचली आहे. तर ३ जणांचा आज मृत्यू झाला आहे. उरणमध्ये कोरोनाच्या संसर्गाने अक्षरक्ष: थैमान घातले आहे. त्यात रोज नवीन रूग्ण सापडू लागल्याने तालुक्यासह शहराचेही टेन्शन वाढू लागले आहे. नवघर साई मंदिर १, धुतूम १, जसखार २, जेएनपीटी १, वेश्वि २, प्रभात को.ऑप. हौस. सोसायटी उरण १, जांभुळपाडा ४, चिरले १, चिरनेर १, कोटनाका १, डोंगरी १ असे एकूण १६ जण पॉजेटीव्ह सापडले आहेत. जासई १, वेश्वि १, द्रोणागिरी १, सीआयएसएफ १, उरण २, आवरे १, पाणदिवे १, सावरखार १, जसखार १, नागाव १, नवघर १, जेएनपीटी २, मुळेखंड १ असे १५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर विंधणे, करंजा, डोंगरी येथील प्रत्येकी १ असे एकूण ३ जण आज कोरोनाग्रस्त मयत झाले आहेत. एकूण पॉजेटीव्ह ६५७, बरे झालेले ४७४, उपचार घेणारे १६२ तर मयत २१ अशी आकडेवारी असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव उरणमध्ये वाढत चालला आहे.आज जरी पॉजेटीव्ह व बरे झालेले पेशंट याची आकडेवारी झुलत असली तरी आज ३ जण कोरोनाने मयत झाले आहेत. यावरून मयताचा आकडा वाढत चालला असल्याचे दिसते. तरी उरणच्या जनतेने जागृत होऊन योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.






Be First to Comment