सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
देशी बनावटीचे दोन गावठी कट्टे आणि जिवंत काडतुस विक्रीसाठी आलेल्या इशरत अब्दूल रहीम बेग उर्फ अर्षद सय्यद (वय 28 रा. चिताकॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई)याला पोलीसांनी सापळा रचून अटक केल्याची घटना चौक गावाच्या हद्दीत घडली .
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार राजा पाटील यांना खब-यामार्फत खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चौक इथे एक इसम देशी बनावटीचे दोन गावठी कट्टे विक्री करता आणणार आहे अशी माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि एस नवले ,पोलीस हवालदार राजा पाटील ,एम दुसाने,आर पिंपळे आणि प्रतीक सावंत असे पथक तयार करून चौक फाटा या ठिकाणी सापळा लावण्यात आला.
त्यावेळी एका रिक्षातून एक संशयित इसम हा खाली उतरून रस्त्याच्या एका बाजूने संशयितरित्या जात असताना पोलीसाना संशय आला.पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील बॅगची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये 18हजार रूपये किंमतीचा 5 इंच लांबीचा लोखंडी बॅरल असलेला लोखंडी गावठी कट्टा, 6 इंच लांबीचा लोखंडी बॅरल असलेला 18हजार रूपयाचा लोखंडी गावठी कट्टा आणि 3000 रूपये किंमतीचे 6 जिवंत काडतुस सापडले. बेकायदेशीर, अवैद्य दोन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुस मिळाल्याने इशरत अब्दूल रहीम बेग उर्फ अर्षद सय्यद विरूद्ध खालापूर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार अधिनियम 1959 कलम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








Be First to Comment