Press "Enter" to skip to content

कोरोना काळातही यांची बैल शर्यतीची हौस

रायगड जिल्ह्यातील गोरेगावमध्ये कोव्हिड बंदीच्या काळात बैलगाडी शर्यतीचे आयोजन : डी वाय एस पी प्रवीण पाटील यांची बेधडक कारवाई

सिटी बेल । रायगड । धम्मशील सावंत ।

रायगड जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढतो आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकार मार्फत कडक निर्बंध लादले जातायेत, अशातच बैलगाडी शर्यतीवर बंदी आणि कोरोना संसर्ग टाळण्यासाठीच्या नियमांची पायमल्ली करीत आज रायगड जिल्ह्यातील गोरेगावमध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजित करण्यात आले होते.  माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी शर्यतीच्या ठिकाणावर भेट देत आयोजकांवर कारवाई केली आहे. 

      द

हिवली कोंड येथे बैलगाड्यांची शर्यत आयोजित करण्यात आली होती.  यावेळी तेथे शर्यतीसाठी आलेल्या सहा बैलगाड्या आणि गाडीवान बैलांना टोकदार वस्तु लावून बैलांना अमानुष्पणे पळवित असताना पोलिसांना दिसून आले. 

यावेळी पोलिसांनी सहा बैलगाड्यांसहा जणांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर तीन गाडीवान आणि अन्य लोक फरार झाले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.