Press "Enter" to skip to content

अलिबाग नगर परिषदे तर्फे कोविड साखळी रोखण्यासाठी महत्वाचे पाऊल

सिटी बेल । अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग नगरपरिषदेने कोविड प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खाजगी प्रयोगशाळा एरोहेड सर्व्हिसेस पनवेल, यांच्या सहकार्यातून अलिबागमधील ज्येष्ठ नागरिक हॉल, येथे आज गुरुवार, दि. 22 एप्रिल पासून कोविड चाचणी केंद्र सुरु केले आहे.

अलिबाग नगरपरिषद अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी , अलिबाग नगरपालिका प्र. मुख्याधिकारी गोविंद वाकडे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम आजपासून सुरु करण्यात आला आहे.
या केंद्रातून शासनाने ठरवून दिलेल्या दरात रॅपिड अँटीजेन, आरटीपीसीआर, कोविड अँटीबॉडी अशा विविध वैद्यकीय तपासण्या नागरिक करून घेऊ शकणार आहेत.

तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी व अलिबाग नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी गोविंद वाकडे यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.