Press "Enter" to skip to content

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची जेएसडब्लू हॉस्पिटलला भेट

पेण येथील जेएसडब्लू कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये 700 ते 800 बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरू होणार

सिटी बेल । रायगड । धम्मशील सावंत ।

रायगड जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील वाढत्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या पेण-डोलवी येथील जे.एस.डब्ल्यू कंपनी ठिकाणी सर्व सुविधायुक्त अद्ययावत जम्बो कोवीड केअर सेंटर सुरू केले जात आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री आदिती तटकरे यांनी आज जेएसडब्लू हॉस्पिटलला भेट दिली.

या हॉस्पिटलमध्ये जवळपास ७०० ते ८०० बेड्सचे सर्व सुविधायुक्त हे जम्बो कोवीड केअर सेंटर सुरू होऊन नागरीकांना सर्व आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.