सिटी बेल लाइव्ह / अलिबाग (प्रतिनिधी)
दररोज कोरोनाबद्दल खुप काही ऐकण्यास मिळत असताना आणि खाकी वर्दीतले देव यांच्याबद्दल कुठेही समाधानकारक ऐकायला मिळत नसताना अलिबाग तालुक्यातील कणे येथील विलास अनंत पाटील यांचा कोविड टेस्ट रिपोर्ट पाॕझिटिव्ह आल्यानंतर त्यांना लगेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिजामाता कोविड सेंटरला दाखल केले .तेव्हा तिथे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना साथरोग यंत्रणेवर नियंत्रण ठेवणारे डाॕ.पाडोळे यांनी अनेक पेशंटला जीवदान दिल्याचा अनुभव ऐकला आणि विलास पाटील हे रुग्णही कोरोनामुक्त केले, असा अनुभव रुग्णाचे भाचे अलिबाग पोलीस ठाणे गोपनीय शाखा पोलीस नाईक मितेश म्हात्रे यांनी सांगितला.
अलिबागचे प्रांताधिकारी, तहसिलदार व अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून डाॕ.पाडोळे यांच्या रुग्णसेवेबद्दल ऐकून असताना पाच दिवसात त्यांची ती पोलीस कोविड सेंटरमधील तपासणी, जिल्हा कारागृहातील भेट, कोरोन्टाईन लोकांशी संपर्क व अनेक सरकारी अडचणींवर मात करुन रुग्णांना जीवन देणारी त्यांची इतर डाॕक्टर व स्टाफ यांच्या सहकार्याने कसोशीने कोरोना रुग्णांना संसर्गापासून मुक्त करीत आहेत.
अलिबाग कोळीवाडा येथील दोन तरुण सागर पेरेकर व त्यांचा भाऊ गेले ३ महिन्यापासुन या सर्व मोहिमेत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे डाॕक्टर व नर्स यांना नि:शुल्क समाजसेवा करीत आहेत, असा अनुभव यावेळी पोलीस नाईक मितेश म्हात्रे यांनी सांगून डाॕ.पाडोळे यांच्या रुग्णसेवेचा गौरव करीत त्यांच्या मामासाठी ते देवदूत ठरल्याचे आवर्जून सांगितले.






Be First to Comment