वाहने चोरी करून कटिंग करणार्या टोळीला पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ने केले गजाआड
सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।
पनवेल परिसरातील वाहने चोरून त्यानंतर पूर्ण वाहन तोडून त्याच्या विविध भागाची बाजारपेठेत विक्री करणार्या टोळीला पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ने गजाआड केले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग ,अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.शेखर पाटील .पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी वेळोवेळी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात बाबत गुन्हे शाखांना प्रयत्न करण्यास सांगितले होते.त्यानुसार कळंबोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 160 /21 कलम 379भा.द.वि.(40 फूट लांबीचा ट्रेलर) या गुन्ह्याचा तपास मा.सहा.पोलीस आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली,गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी त्यांच्या नेतृत्वा खाली विशेष पथक तयार करून वहान चोरी चा अभिलेख, गुन्ह्यांची घटनास्थळ, तेथील तांत्रिक तपास सुरु केला.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखा 2 चे सपोनि प्रवीण फडतरे व पो.ना. प्रफुल्ल मोरे यांना मिळालेल्या गुप्त बातमी अनव्ये इसम नामे हैदर तजमुल अन्सारी वय 24 रा रूम नं.16, महाराष्ट्र स्कूल जवळ सेक्टर 12 कळंबोली यास ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यातील 40 फुटी ट्रेलर हा त्याने व त्याचा साथीदार मुर्तुजा उर्फ गबरू, मोराज, शाहिद व राजा यांच्यासह चोरी करून तो हाजी मलंग डोंगराच्या पायथ्याशी नेऊन तेथील रिकाम्या जागेवर गॅस कटरने कट करून ठेवला असून त्याचे पार्ट्स लॉकडाउन नंतर विक्री करणार असल्याचे कबूल केले. नमूद आरोपीस अटक करून गुन्ह्यातील 40 फुटी ट्रेलर कटिंग केलेल्या अवस्थेत हस्तगत करण्यात आलेला आहे.
तसेच नमूद ठिकाणी कटिंग करण्यासाठी लागणारे साहित्य व सिलेंडर एक छोटा हत्ती टेम्पो क्र.एमएच 46 बीएम 458 मध्ये ठेवले असल्याचे आढळून आले. सदर टेम्पो बाबत चौकशी केली असता पाहिजे आरोपी राजा याने सदरचा टेम्पो कळंबोली येथून आणला असल्याचे निष्पन्न झाले. सदर चा टेम्पो ही कळंबोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर 164/ 21 मधील चोरी झालेला असल्याचे निष्पन्न झाले आहे.तरी नमूद अटक आरोपी व पाहिजे आरोपी यांच्याकडून कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदर कामी गुन्हे शाखा कक्ष 2 चे पो.ह.प्रशांत काटकर, सुनील साळूंखे, अनिल पाटील, पो ना प्रफूल्ल मोरे, प्रवीण भोपी, रुपेश पाटील, आदिनाथ फुदे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.








Be First to Comment