Press "Enter" to skip to content

कोरोना पाश्र्वभूमीवर कानसा वारणा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे.कोरोना संसर्ग कधी, कुठे, कसं, कुणाला कशाप्रकारे गाठून वेठीस धरेल.हे कुठलाही ज्योतिषी वा तज्ञही सांगू न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा आलेख वाढतच असल्याने या रुग्णांना बेड,हाॅस्पिटल, वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, यासाठी चौक वावर्ले येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोरोनाच्या प्रभावामुळे खालापूर, पनवेल,कर्जंत,नवी मुंबई, मुंबई, शाहुवाडी,शिराला येथील कोरोनाबाधित पिडीतांसाठी बेड व सोय करून देणे तसेच वैद्यकीय तपासणी व इतर मदतीसाठी २४ तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी दिपकदादा पाटील यांनी कोरोना रुग्णांसाठी उपक्रम सुरू केला असून याचा फायदा दहा स्कोअरच्या आतील कोरोना रुग्णांना मिळणार आहे.

यासाठी कोरोना रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी दिपकदादा पाटील-मो.9021132220,

नागेश यादव-9702930071,

रामदास पाटील-7756844584,

महेंद्र पाटील-8104638322

यावर संपर्क करावा असे कानसा वारणा फाउंडेशनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.