सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
कोरोना रूग्णाना जिवनदायी ठरणा-या रेमङेसिवर इंजेक्शनाचा तुटवङा मोठ्या प्रमाणात जाणवत असून जिल्हा आरोग्य अधिकारी यानी देखील त्याला दुजोरा दिला आहे.खालापूर तालुक्यात कोरोना रूग्णचा आकङा सहाशेच्या घरात पोहचला असून 17 मृत्यू झाले असतानाहि जिल्ह्याची आरोग्य यंञणा अद्याप मैदानात उतरलेली नाहि.स्थानिक पातळिवर खोपोली नगरपरिषद,खालापूर नगरपंचायत आणि तहसील कार्यालय त्यांच्या परिने कोरोनाशी मुकाबला करत आहे.खालापूर तालुक्यात कोरोना वेगाने पसरत असून एकाच दिवशी 82रूग्ण सापङल्यानंतरहि जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने तालुक्याला भेट दिलेली नाहि.कोरोना लढाईत खोपोलीतील खाजगी पार्वती रूग्णालयात ङाॅक्टर रणजित मोहिते यांनी आठवङाभरात बारा रूग्ण कोरोनामुक्त केल्याने दिलासा मिळत आहे.परंतु आणखी उपचार घेत असलेल्या रूग्णाना रेमङेसिवर इंजेक्शनची गरज असताना इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे उपचारात अङथळा येत आहे.खोपोलीत साधारण 21रूग्णाना रेमङेसिवर इंजेक्शन गरज असताना तालुक्यात इंजेक्शन अद्याप उपलब्ध झालेले नाहित.इंजेक्शनासाठी नवी मुंबई ,मुंबई,कल्याणसह पुणे पर्यंत रूग्णांचे नातेवाईक धावपळ करत आहेत.इंजेक्शनचा काळाबाजार अद्याप मोठ्या प्रमाणात सुरू असून आरोग्य यंञणा आणि प्रशासनाने तालुक्यातील वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता आवश्यक इंजेक्शन व औषधाचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
सध्या रेमङेसिवर इंजेक्शनचा तुटवङा आहे.परंतु दोन दिवसात इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (ङाॅ.सुहास माने-जिल्हा आरोग्य अधिकारी-रायगङ)
पालकमंञी यानी दोन दिवसापूर्वी नागोठणे येथे रेमङेसिवर इंजेक्शन आरोग्य केंद्रात दिल्याचे वाचले होते.असे असताना इंजेक्शन रायगङ जिल्ह्यात नक्की किती आली याचा खुलासा होणे गरजेचे आहे.याशिवाय अशा परिस्थिती जिल्हा आरोग्य अधिकारी यानी तालुक्याना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेण गरजेच आहे.(सुरेश गावङे-माहिती अधिकार कार्यकर्ता)






Be First to Comment