अनैतिक प्रेम संबंधाच्या संशयावरून एका तरूणांची केली तीन तरूणांनी हत्या
सिटी बेल । तळोजा । वचन गायकवाड ।
आपल्या पत्नीसोबत अनैतिक प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून पती (राहूल विलोग वय 20 ) या तरूणांने आपल्या दोन मित्रांच्या साथीने एका 35 वर्षीय तरूण इसमाची हत्या केल्याची घटना पनवेल तालुक्यातील घोट गावात दिनांक 16 एप्रिल राञी 1 वाजताच्या दरम्यान घडली होती.
राहूल विलोंग वय 20 या तरूणांने मयत दिनेश जग्गनाथ यादव वय 35 याचा आपल्या पत्नीशी अनैतिक प्रेम संबंध असल्याचा संशयावरून दिनांक 16 एप्रिल 2021रोजी राञी 1वाजताच्या दरम्यान राहूल विलोंग वय वष॔ 20, या तरूणांने आपले दोन मिञ राजू लोहरा वय वर्ष 20, रतिश बराईत वय वष॔ 29, यांना सोबत घेवून मयत दिनेश जग्गनाथ यादव या तरूण इसमाची हत्या करून त्याचा मुतदेह घोट गावातील व्हि.व्हि.एफ. कंपनीच्या मागे असलेल्या तलावात टाकले होते. त्याच बरोबर पोलिसाच्या हातात कोणताही पुरावा लागू नये म्हणून मयत इसमाच्या उजव्या पायाच्या मांडीस दगड बांधून त्याला तलावात टाकण्यात आले होते. अशा प्रकारे निघुण हत्या या तरूण इसमाची या तीन तरूणांनी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दिनांक 18 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता घोट गावातील तलावात मयत दिनेश यादव याचा मुतदेह तळोजा पोलिसांना आढळून आला. यावेळी मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते. त्याची हत्या करणार्या आरोपीचा शोध घेणे हे एक मोठे आव्हान तळोजा पोलिसांच्या समोर होते. मयताच्या खिशात बालाजी इटंरप्राईजेस चे आयडी काड॔ वरून चौकशी केली असता तो व्हि.व्हि. एफ कंपनीत कामगार असल्याच समोर आल्यानंतर वरील प्रकार उघडकीस आला.
मयत आणि वरील तीन आरोपी हे व्हि.व्हि.एफ.या कंपनीत काम करत असल्याचे समोर आले. मयताचा आपल्या पत्नीशी अनैतिक प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून हि हत्या झालीची बाब समोर आली. या तीन आरोपीना दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी अटक करण्यात आली.
याबाबत या घटनेचा तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तळोजा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्या माग॔दशनाखाली तळोजा गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक संजय नाळे, सपोनि विशाल राजवाडे, पोलिस उपनिरीक्षक अस्लम पटेल व पथकाने याबाबत अधिक शोध घेतला असता या खूनाचा उलगडा झाला असून याप्रकऱणी राहूल विलोग, राजू लोहरा, रतिश बराईत या तीन आरोपीना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.








Be First to Comment