सामाजिक कार्यकर्ते राजेश भोईर यांच्याकडून गरजूंना आधार !
सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे ।
कोरोनाच्या संकटांत जनतेला मोठ्या आर्थीक बाबीला सामोरे जावे लागत आहे.कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या हातच्या नोकऱ्या गेल्या आहेत.त्यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठी उसळी घेतली आहे.
अशातच गोरगरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या म्हणजे ज्यांचे संसार हातावर चालते अशांना थोडा आधार मिळावा या हेतूने उरणचे माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या आदेशाने मोठीजुई गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे युवा कार्यकर्ते राजेश जगदिश भोईर यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त दर वर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या वाढदीवशी सत्कर्माचा योग घडावा या दृष्टीने चिरनेर गावा शेजारी असणाऱ्या विटभट्टीवर मजुर म्हणुन काम करुन झोपडीतच आपले जिवन जगत असलेल्या गरीब कुटूंबांना जिवानवश्यक वस्तू वाटप करण्याचा निर्धार केला आणि त्या गरीब कूटूंबांना तांदूल,गहू,कांदे,साखर,मुगडाळ,चणाडाळ,चहापावडर,मसाले,हळद,गोडेतेल,साबण,डीटर्जन पावडर,कोळगेट, बिस्कीट, चाँकलेट आदि जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.
या वेळी सकाळचे पत्रकार सुभाष कडू,मोठीजुई सामाजिक विकास मंचचे राजेश भोईर,नागेश भोईर,प्रियाल पाटील,स्वप्निल पाटील,बाळु पाटील, कुंदन पाटील,मनिष पाटील,प्रशांत पाटील,प्रविण कामोठकर,पवन जोशी सह एंजाँय ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
Be First to Comment