Press "Enter" to skip to content

मनोज खेडकरांची मागणी : नगरपरिषदेने भटक्या कुत्र्याचे निर्बिजीकरण करावे

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #


माथेरान मध्ये मागील काही वर्षांपासून मोठया प्रमाणावर भटक्या कुत्र्याच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे.त्यामुळे नगरपरिषदेने याबाबत ठोस उपाययोजना राबविण्यासाठी लवकरात लवकर भटक्या कुत्र्याचे निर्बिजीकरण केल्याशिवाय ही होणारी वाढ आटोक्यात येणार नाही. याबाबत माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांना दि.२१ जुलै रोजी निवेदन सादर केले आहे.
सन २००७ ते २००९ या दरम्यान आम्ही नगरपरिषद मध्ये सत्तेत असताना गावातील सर्व भटक्या कुत्र्याचे निर्बिजीकरण करण्यासाठी प्रयत्न केले होते त्यानंतर जवळपास मोठा कालावधी उलटून गेला असून याकडे नगरपरिषदेने फारसे गांभीर्याने लक्ष केंद्रित न केल्यामुळे पुन्हा या भटक्या कुत्र्याची वाढ मोठया प्रमाणावर झालेली दिसत आहे. माथेरान करांचे संपूर्ण जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असते नेहमीच बाजारात ही मोकाट भटकी कुत्री नागरिकांना तसेच पर्यटकांना त्रास देत असतात. याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होत असतो. लवकरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले इथले सर्वांचे व्यवसाय पूर्वपदावर येणार आहेत त्यामुळेच पर्यटनाला अडसर ठरणाऱ्या या मोकाट भटक्या कुत्र्याचे निर्बिजीकरण नगरपरिषदेने करावे असे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.