Press "Enter" to skip to content

कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रांजल कडू ने मांडल्या चित्राद्वारे सूचना

सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू ।

जगाबरोबर आपल्या देशात व राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे बळी जाणार्‍यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कोरोनापासून कशाप्रकारे बचाव करायचा हे उरण येथील 10 व्या इयत्तेत शिकणार्‍या प्रांजल घन:श्याम कडू हिने चित्र काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. त्यामुळे कधी नव्हे ते सर्वच बंद होत आहे. देशात व राज्यात संचारबदी असल्याने सर्वच ठराविक वेळेतच व काही अंतर ठेवून खरेदी-विक्री करावी लागत आहे. तसेच फिरण्यावर निर्बंध आले आहेत. मुलांना तर घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जाऊन बळी जाणार्‍यांचा आकडाही वाढत चालला आहे.

कोरोनापासून आपला बचाव कसा करायचा हे उरण सेंटमरी हायस्कुल मधील 10 इयत्तेत शिकणार्‍या प्रांजल घनश्याम कडू हिने चित्राद्वारे सूचित केले आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी प्रामुख्याने सॅनिटायझर, तोंडावर मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळणे, हात साबणाने धुवणे, फळे खाणे आदींची माहिती चित्रामध्ये ठळकपणे नमूद केली आहे. तर तिसर्‍या छायाचित्रात पोलीस, डॉक्टर, नर्स व सफाई कामगार हे आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी कार्यरत असल्याचे चित्राद्वारे दर्शविण्यात आले आहे. अशा प्रकारे प्रत्येकाने वागले तर नक्कीच लवकरात लवकर कोरोनाचा नायनाट होईल असे प्रांजल कडू हिचे प्रांजल मत असल्याचे चित्रावरून स्पष्ट होत, एकप्रकारे जनजागृती करण्याचा प्रयत्नच केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.