आज रोहे तालुक्यात सापडले कोरोनाचे १७ नवीन रुग्ण : एकाचा मृत्यू
सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार )
रोहे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस अधिक वाढू लागला असून,आज नव्याने १७ रुग्ण पाँझिटिव्ह सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्ण संख्या ही ३७५ वर पोहोचली आहे.
रोहे तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने अक्षरक्ष: थैमान घातले आहे.त्यात रोज नवीन रूग्ण सापडू लागल्याने तालुक्यासह शहराचेही टेन्शन वाढू लागले आहे.
.तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती प्रशासनाच्या हाताभाहेर गेल्याने जिल्ह्यात पुन्हा दि.१५ रात्री बारावाजल्या पासून ते २६ जुलै रात्री पर्यंत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे.
आज तालुका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार रोहे तालुक्यात आज नव्याने १७ रूग्ण सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्णसंख्या ३७५ वर पोहोचली आहे.सध्या ७९ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत तालुक्यात ९ जण मयत झाले आहेत.तर २८७ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे. तरि घरीच राहा सुरक्षित रहा व आपल्याबरोबर आपल्या परिवाराचेही संरक्षण करा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.






Be First to Comment