Press "Enter" to skip to content

पुई गावांत मानसिक विकृती ने गाठला कळस

सुधीर लहाने यांच्या बलेनो कार वर काळ्या रंगाचे पट्टे मारुन वाहनाचे केले नुकसान ; पोलिसात तक्रार दाखल

सिटी बेल । कोलाड । कल्पेश पवार ।

कोलाड विभागातील पुई येथे सुधीर लहाने यांनी आपल्या घरासमोर उभी केलेल्या वाहनांवर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करीत या पांढऱ्या रंगाच्या वाहनांवर काळे डाग उडून वाहनाचे मोठया प्रमाणावर नुकसान केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पुई येथे राहणारे सुधीर महादेव लहाने यांनी नेहमी प्रमाणे आपल्या घराच्या समोर सफेद रंगाची बलेेनो वाहन क्र.( एम एच 06 बीएम 3585 )ही पार्क करून ठेवली होती.दरम्यान रात्रीच्या अंधारात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करीत वाईट प्रवृत्तीने या सफेद रंगाच्या वाहनांवर स्प्रेच्या साहाय्याने काळ्या रंगाचे डाग उडून या चांगल्या वाहनाचे मोठया प्रमाणावर नुकसान केले आहे.कोलाड पोलीसात या घटनेची तक्रार करण्यात आली असून,या बाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीची मनोवृत्ती एवढी हीन झाली आहे की,जो प्रामाणिक सत्याचा मार्ग अवलंबतो त्याला लोक नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यामुळे अशा प्रकारच्या वाईट प्रवृत्तीला वेळीचं आला बसने योग्य आहे.पोलिसांनी सुद्धा या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देउन अशा व्यक्तीच्या मूसक्या आवळणे गरजेचे आहे.तरच लहाने यांना न्याय मिळेल अशी चर्चा नागरिकांन मध्ये आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.