Press "Enter" to skip to content

हसतमुख, उत्साही, कार्यतत्पर तारका हरपली

” पनवेल भगिनी समाज ” महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ.जयश्री खरे यांना देवाज्ञा

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

” पनवेल भगिनी समाज ” या पनवेलच्या ९४ वर्षे जुन्या महिला मंडळाच्या विद्यमान उपाध्यक्षा सौ.जयश्री खरे यांना दोन दिवसांपूर्वी देवाज्ञा झाली. मंडळाची सदैव हसतमुख, उत्साही व कार्यतत्पर तारका हरवली.

सर्वाना सांभाळून घेत जमेल तसं सतत कार्यरत राहून नवनवीन माणसं स्वतःबरोबर मंडळाला जोडण्याची कला त्यांना अवगत होती. सगळ्यांवर विश्वास टाकून व्यवस्थित कामे करवून घेणे व निःसंकोचपणे त्यांचे कौतुक करणे या त्यांच्या साध्या व सरळ स्वभावामुळे अनेकांना फायदा झाला. त्या नेहमी म्हणायच्या, मी चांगलेच वागीन माझा देव बघतो आहे, असं म्हणणाऱ्या या भक्ताला ईश्वराने आमच्यातून हिरावून नेले आहे. अर्थात ” जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला ” हे खरंच आहे.
“ईश्वरेच्छा बलियासी” त्यांच्या मागे त्यांचे पती, आणि दोन मुलगे आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सर्व भगिनी समाज पनवेल सदस्या सहभागी झाल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.