Press "Enter" to skip to content

शिवसेना चाणजे-केगाव विभागतर्फे रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांचे रक्तदान

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।

मुख्यमंत्री उसद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहाना नुसार व जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या आदेशानुसार शिवसेना उरण तालुक्याच्या चाणजे-केगाव विभागाच्या वतीने चाणजे ग्रामपंचायत कार्यालय येथे रविवार दिनांक १८ एप्रिल रोजी शासनाच्या नियमानुसार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सदर रक्तदान शिबीराचे उदघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, कामगार नेते महादेव घरत, उपतालुका प्रमुख जयवंत पाटील, उपतालुका संघटक अमित भगत, सरपंच मंगेश थळी यांच्या हस्ते झाले.
चॅरिटेबल ब्लड बॅक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ८० रक्तदात्यानी रक्तदान करून केले. यावेळी उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहर प्रमुख विनोद म्हात्रे माजी नगरसेवक निलेश भोईर, शिक्षक सेनेचे कौशिक ठाकूर, चिरनेर ग्रामपंचायत सदस्य धनेश ठाकूर, विभागप्रमुख(चाणजे) हरेश्वर म्हात्रे,
विभागप्रमुख (केगाव) एस के पुरो उरण, उपविभागप्रमुख रवी पाटील, चाणजे विभागातून शाखा प्रमुख रोहिदास म्हात्रे, उपशाखाप्रमुख राजेंद्र पाटील, विश्वनाथ पाटील, रवी पाटील परेश थाळी, मोहन म्हात्रे संदीप, ग्राम पंचायत सदस्य वेंकटेश म्हात्रे सुप्रिया कोळी, मानसी थळी,युवा सेनेचे महेश थळी ,सागर डाऊर ,निखिल थाळी ,संकेत कोळी, कल्पेश भोईर ,नितेश पाटील, केगाव विभागातून कमलाकर तांबोळी, महेश पाटील, अनिल पाटील, राहुल पाटील, गणेश पाटील प्रकाश घरात, आशिष तांबोळी हेमंत पाटील तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक सोशल डिस्टन्स नियमानुसार उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.