Press "Enter" to skip to content

मोटरसायकल चोरास कर्जत पोलिसांनी केली अटक

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

एका कार्यालयाच्या समोर ठेवलेली मोटारसायकल चोरून नेलेल्या अज्ञात चोरट्याला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अजून काही गुन्हे आहेत का? याबाबत कर्जत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कर्जत तालुक्यातील आषाणे – कोषाणे येथे राहणारे योगेश रामचंद्र ठाणगे यांनी दि.8 एप्रिल 2021 रोजी दहिवली येथील राष्ट्रवादी भवनासमोर त्यांची हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल उभी करून ते कामाला निघून गेले होते. कामावरून आल्यानंतर त्यांना सदर ठिकाणी उभी केलेली आपली मोटरसायकल दिसून आली नाही. म्हणून त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र त्यांची मोटरसायकल त्यांना कुठेच आढळून आली नाही. म्हणून त्यांनी कर्जत पोलिस ठाण्यांमध्ये कॉ. गु. रं. नंबर 87/2021 भा. द. वि. कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखालीगुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, पोलीस अंमलदार भूषण चौधरी, पोलीस अंमलदार अश्रूबा बेंद्रे यांनी तपास सुरू केला.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसम अक्षय स्वामीनाथ डांगरे वय -25 राहणार कोलीवली पोस्ट -वाकस, तालुका -कर्जत, यास संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपी डांगरे यास पोलिसांनी अटक करून चोरून नेलेली 15 हजार किंमतीची हिरो होंडा कंपनीची फॅशन प्रो मोटारसायकल जप्त केली.

सदर आरोपी यास न्यायालयात हजर करून न्यायालयाकडून पोलीस कोठडी रिमांड घेवून त्याने अजून काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.