सिटी बेल । आवरे । कौशिक ठाकुर ।
देह मिळाले एकदाच समाज हितसाठी झिजविला चंदनापरी ! प्रत्येक जण आपला वाढदिवस हा पार्टी किंवा इतर गोष्टी उधळून साजरा करत असतो परंतु आवरे गावातील प्रतिष्ठित नागरिक व आवरे गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री गणेश ठाकुर यांनी आपला वाढदिवस हा समाज उपयोगी पवित्र कार्य म्हणजेच शिवसेना तर्फे महारक्तदान शिबिरात रक्तदान करुन साजरा केला.
गणेश ठाकुर हे आवरे गावातील एक सोज्वळ असे व्यक्तिमत्व आहे. या अगोदर देखील त्यांनी साई गणेश मित्र मंडळ आवरे तर्फे सुध्दा अनेक सामजिक उपक्रम हाती घेऊन तडीस नेले आहेत. सामजिक उपक्रमात सतत आपल्याला झोकून देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. सोबत आपल्या कुटुंबाचे सुद्धा चांगल्या पद्धतीने सांभाळ करत आहेत. म्हणजे समाजहित हेच उद्देश होय.
गणेश ठाकूर यांच्या आजच्या उपक्रमाबद्दल मा आमदार मनोहरशेठ भोईर, मधुकर प्रतिष्ठान आवरे , सुयश क्लासेस आवरे , सारडे विकास मंच आवरे शिवसेना शाखा आवरे या सर्वांनी वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.








Be First to Comment