बारवई बुध्दविहारामध्ये मिटींग घेऊन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने निलेश बाबरे व इतरांवर गुन्हा दाखल
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
बारवई येथील निलेश सुरेश बाबरे व इतर आठ जणांनी बारवई गावच्या बुध्दविहारात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सभा घेतल्याने त्याची फिर्याद बारवई पोलिस पाटील अर्चंना बाबरे यांनी पोलिसांत केल्याने शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याने निलेश बाबरे व इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे माहिती असताना कोरोना या विषाणुचा संसर्ग होऊन साथ पसरण्याची शक्यता असताना सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने लाॅकडाऊन, जमावबंदी तसेच संचारबंदी आदेश दिले आहेत. निलेश बाबरे यांनी बारवई गावातील आठ लोकांना एकत्र जमवून मिटींग भरवून तसेच जमलेल्या सर्वांनी मास्क न लावता तसेच सोशल डिस्टिंक्शनचे पालन न करता कोरोना या विषाणू रोगाचा संसर्ग होवून साथ पसरण्याची शक्यता असताना शासन आदेशाचे उल्लंघन करून मानवी जीवन व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य केल्याची फिर्याद बारवई गावच्या पोलिस पाटील अर्चंना संतोष बाबरे यांनी पोलिसांत केली आहे.
यानुसार पोलिसांनी भादवी कलम 269,188 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 51(ब)सह साथ रोग अधिनियम 1987 चे कलम 3 तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम 37(1),(3)135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.







Be First to Comment