महाराष्ट्र राज्य कब्बडी संघाला तृतीय क्रमांक पटकावुन देणारा गणेश क्लब संघाचा अष्टपैलू खेळाडू मयुर कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन
सिटी बेल । उरण । दिप्ती पाटील ।
दि. १३ ते १६ एप्रिल २०२१ रोजी उत्तर प्रदेश मधील अयोध्या येथे ६८ वी वरीष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा संपन्न झाली आहे.
उरण तालुक्यातील बोकडविरा गावातील गणेश क्लब संघाचा अष्टपैलू खेळाडू मयुर जगन्नाथ कदम जो मुळचा अलिबाग येथील तलवली गावचा पण बालपणापासून बोकडविरा गावचा रहिवासी असलेला मयुर कदम २०१५ पासून गणेश क्लब संघातुन खेळतो. कुमार गट ते वरिष्ठ गट मधुन दोन दोन वेळा खेळलेला आणि २०१७ मध्ये रायगड जिल्हा वरिष्ठ गट कब्बडी संघातून खेळला होता. तेव्हा सुध्दा रायगड जिल्हाचा पहिला नंबर आला होता. दि. २७ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रातील ११५ खेळाडून मधुन १२ खेळाडूनची महाराष्ट्र राज्य कब्बडी संघासाठी निवड झाली त्यामध्ये मयुर कदम याची निवड झाली.

अवघ्या २३ वर्षाच्या मयुरने महाराष्ट्र संघातुन खेळुन महाराष्ट्र राज्य कब्बडी संघाला प्रथम क्रमांक मिळवुन दिल्याबद्दल त्याच्यावर रायगड जिल्ह्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. आज बोकडविरा गावात प्रवेश करताच क्षणी त्यांला गणेश क्लब चे सर्व खेळाडू यांनी त्याची खाद्यावर बसवुन त्याचे स्वागत केले.
महाराष्ट्र राज्य कंब्बडी संघाला तृतीय क्रमांक मिळाल्यामुळे रोख रक्कम एक लाख स्मृती चिन्ह सर्व टीमला प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले .रायगडचा सुपुत्र गणेश क्लबचा खेळाडू मयुर कदम हा आपल्या अभेद्य बचावाच्या जोरावर सामन्यावर नियंत्रण मिळवत बलाढ्य खेळाडूंना मैदानाची धुळे चारत खेळाडूंना चार मुंड्या चित्त करत धडाकेबाज खेळी करून राहुल चौधरी, नितीन तोमर( उत्तर प्रदेश) नवीन कुमार, सुरजीत (सेनादल) सारख्या धडाकेबाज प्रो स्टार खेळाडूंना आपल्या रांगड्या खेळाने उचलबांगडी करणारा रायगड जिल्ह्याचा व गणेश क्लबचा लाडका खेळाडूं मयुर कदम यास तमाम कब्बडी रसिकांन कडून लाख लाख शुभेच्छा.








Be First to Comment