खालापूर तालुका अध्यक्षपदी जयेंद्र भंडारकर
सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
शिवराज्य कामगार हक्क संघटना संलग्न पोलीस सेवा संघटनेने शहरातील अनेक नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांची दखल घेत त्यांना संघटनेत सामावून घेतले आहे.यात रसायनी आपटा येथील गणेश दिलीप थोरवे यांची पोलीस सेवा संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून संघटनेच्या कार्यकारिणीतील इतर सदस्यांची देखील निवड करण्यात आली आहे.अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेऊन पोलिसांना केलेल्या सहकार्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे.यावेली
रोहन रामचंद्र भोईर यांची पनवेल ग्रामीण तालुका अध्यक्षपदी, तर राकेश शिर्के पनवेल ग्रामीण उपाध्यक्ष व प्रतिक भोईर पनवेल ग्रामीण सचिव म्हणून काम पाहतील.
तर मोहोपाडा शिवनगर येथील जयेंद्र शांताराम भंडारकर यांची खालापुर तालुका अध्यक्षपदी, तर धनंजय पाटिल उपाध्यक्ष व केतन भोईर – सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.
पुणे येथील शिवराज्य कामगार हक्क संघटनेच्या संलग्न पोलीस सेवा संघटनेच्या त्रैमासिक बैठकीत रायगड अध्यक्षपदी गणेश थोरवे यांची नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोंगळे यांनी केली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र देशमुख यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.कार्यकारिणीच्या नियुक्तीने रायगड जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.






Be First to Comment