Press "Enter" to skip to content

गोवे ग्रामपंचायती जवळ विद्युत खांब वाकला

कोलाड महावितरण कंपनीचे दुर्लक्ष, नागरिकांच्या जिवाला धोका

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायत कार्यालय समोर विद्युत खांब वाकला असुन याकडे कोलाड विभागीय महावितरण कार्यालय व कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात गोवे-कोलाड रस्त्यावरील गोवे ग्रामपंचायत कार्यालया समोरील असणारा महावितरण कंपनीचा विद्युत पुरवठा करणारा हा पोल गेली दहा महिन्यापासुन वाकला आहे.व या महावितरण कंपनीच्या पोलावरुन जाणारी लाईन २२ K.V.आहे जर हा इलेक्ट्रिक पोल खाली पडला तर मोठा अनर्थ होऊ शकतो.या इलेक्ट्रिक लाईनचे काम कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केले असुन या कॉन्ट्रॅक्टरला ग्रामस्थांनी याविषयी कल्पना दिली आहे.परंतु याकडे हि कानाडोळा केला जात आहे.

हे वाकलेले महावितरण कंपनीचे इलेक्ट्रिक पोल रस्त्याच्या बाजुला आहे व रस्त्याने रोज शेकडो नागरीक येजा करीत असतात अशा वेळी वाकलेले पोल कोसळला तर मोठा अनर्थ होऊ शकतो.असे अनेक पोल हि मोडकळीस आले आहेत अथवा केव्हाही कोसळू शकतो.व पोलावरून इलेक्ट्रिक तारा हि खाली लोंबकळत आहेत.अशा घटनांमुळे कोलाड खांब परिसरात अनेक गुरेढोरे दगावली आहेत व नंतर लाख मोलाचा जिव गेल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा अशी कामे त्वरित केली का जात नाही ?असा खडा सवाल येथील नागरिकांकडुन केला जात आहे त्यामुळे हा पोल त्वरित बद्दलला पाहिजे नाहीतर महावितरण कंपनीच्या कार्यालयावर याविषयी मोर्चा काढण्यात येईल असे गोवे ग्रामस्थांकडुन सांगण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.