सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली.ती आजही दिसून येते.
वासांबे मोहोपाडा कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख गेल्या वीस दिवसांपासून परीसरात वाढतच आहे.सध्या वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागात 17 एप्रिलपर्यंत एकूण 193 रुग्ण अॅक्टीव असून परिसरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 756 झाली आहे.यात कोरोनावर 563 जणांनी मात केली आहे.परिसरात मृत्यूदर जरी कमी असला तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन शासनाच्या वतीने होत आहे.
वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील कोरोनाग्रस्तांची 17 एप्रिलपर्यंत असलेली गावनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
मोहोपाडा –कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-42
रिस परिसर-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या -79
नविन पोसरी-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-7
चांभार्लीं-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या -14
शिवनगर-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-5
आली आंबिवली-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-5
लोधिवली परिसर-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-24
पानशिल-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-3
तळेगाव-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या-3
रिसवाडी-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या 01
तळेगाव वाडी-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या 02
पराडे-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या 01
खाने आंबिवली-कोरोना अॅक्टीव रुग्ण संख्या 02
दरम्यान 17 एप्रिलपर्यंत चौक मंडलात एकूण 1303 रुग्ण संख्या असून एकूण 47 जण मयत झाले आहेत.खालापूर तालुक्यात वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनारुग्णांची संख्या लक्षणीय असून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनासंसर्गांचा आलेख मे मध्यंतरी दिलासादायक राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.तरी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन कोरोनाला परिसरातून हद्दपार करावा.
शासनाने 45 वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड लसीकरण सुरु केले असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी विनाकारण बाहेर न फिरता वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुवावेत,सोशल डिस्टिंक्शन पालावे,मास्कचा वापर करावा असे आवाहन होत आहे.








Be First to Comment