सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे व विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संपूर्ण रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे शाळांवरील पत्रे उडून नुकसान झालेल्या शाळांना एक हात मदतीचा म्हणून सिमेंट पत्र्यांचे वाटप संपूर्ण रायगड जिल्ह्यसह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहेत.
याचाच एक भाग म्हणून या निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकण एज्यकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील श्रिमती आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयालाही १०० सिमेंट पत्र्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले. हे सिमेंट पत्रे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. श्रीकृष्णा तुपारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.






Be First to Comment