सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
कष्टकरीनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी विश्वनाथ गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट बोलून दाखविला.अण्णाभाऊ साठे फक्त दिड दिवस शाळेत जाऊन स्वतःच्या महत्वकांक्षांवर लिहायला वाचायला शिकून त्यांच्यामधल्या प्रतिभावंत विचारांना मोकळी जागा करुन दिली.अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजातील उपेक्षित वर्गातील होते.उपेक्षित समाजाचे दु:ख दारिद्र्य अगदी जवळुन पाहिले होते.अन्याय अत्याचार अनुभवला होता.त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये अन्याय अत्याचाराविरुद्ध लढताना नायक असतो.त्यांना जगताना अतिशय प्रतिकुल परिस्थीतीला सामोरे जावे लागले.पडेल ते काम करावे लागले.पण त्यांनी त्यांच्या क्रांतीवादी विचारांना मरु नाही दिले.
त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी मोठे योगदान होते.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये 13 लोकनाट्ये,3 नाटके,13 कथासंग्रह,35 कादंबरी,1शाहीरी पुस्तक,15पोवाडे,1प्रवास वर्णनआणि 7 चित्रपट कथा इत्यादीचा समावेश होता.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते काका गायकवाड,सुधाकर गायकवाड, दादसाहेब आटपाडकर,अशोक सोनावणे,सुनिल राठोड,हनुमंत साठे,भानुदास गायकवाड,विनोद कांबळे,नंदु खैरनार वैभव गायकवाड आणि तुषार गायकवाड आदी उपस्थित होते.






Be First to Comment