Press "Enter" to skip to content

रायगड हॉस्पिटल कोव्हीड सेंटर की धर्मशाळा
– उदय पाटील


सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड)


रायगड हॉस्पिटल कोव्हीड सेंटर की धर्मशाळा असा प्रश्न रायगड हॉस्पिटल मधील परिस्थिती बघून राष्ट्रवादीचे नेते उदय पाटील यांनी उपस्थित केला आहे.
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलला कोविड सेंटर म्हणून शासनाने मान्यता दिली. याचे श्रेय घेण्याबाबत लोकप्रतिनिधींची अहममीका लागली.विविध वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर या बाबत प्रसिद्धी दिली गेली. आपल्या तालुक्यात शंभर बेड चे रुग्णालय कोरोना बाधितांसाठी उपलब्ध झाल्याने कुठेतरी आशेचा किरण दिसू लागला. परंतु हे हॉस्पिटल म्हणजे फक्त निवारा केंद्र आहे असेच वाटू लागले आहे अशी प्रतिक्रिया उदय पाटील यांनी बोलून दाखवली.
माझ्या भावाला आणि त्याच्या मुलाला ताप आल्याने कशेळे ग्रामीण रुग्णालयात त्यांची कोरोना टेस्ट केली.त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पुढील उपचारासाठी त्याना सरकारी अम्ब्युलन्स ने रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयाच्या वॉचमेन ने त्याना त्यांच्या बेड पर्यंत आणून सोडले इतकेच काम दवाखान्या मार्फत केले गेले. दाखल करून चोवीस तास उलटून गेले परंतु नर्स किंवा डॉकटर या पैकी कोणीही तेथे फिरकला देखील नाही.सलाईन औषधे तर नाहीच पण काय काळजी घ्यायची किंवा कोणते काढे, औषधे घ्यायची या बाबत सूचना द्यायला सुद्धा कोणी आले नाही.
इतके मोठे रुग्णालय पण त्यात पेशन्टला ट्रीटमेंट किंवा मार्गदर्शन करायला नर्स किंवा डॉक्टर चोवीस तासात एकही फेरी मारीत नसतील तर हा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. जेवण आणि नाष्टा पुरविला जातो ही एक त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. येथील पारिस्तिथी वरून हे रुग्णालय म्हणजे धर्मशाळा आहे असेच वाटते. पेशन्ट बाबत होणाऱ्या हलगर्जीपणा बाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स असाव्यात, आणि असतील तर त्यापैकी कोणीतरी किमान चोवीस तासातून एकदा तरी पेशन्ट कडे बघावे इतकीच माफक अपेक्षा उदय पाटील यांनी व्यक्त केल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.