Press "Enter" to skip to content

उरणच्या फुंडे गावाजवळ पूल कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

डोंगरी, फुंडे, पाणजे या तीन गावांचा उरण शहराशी असणारा प्रमुख संपर्क तुटला

सिटी बेल । उरण । अजय शिवकर / घन:श्याम कडू

उरण तालुक्यातील फुंडे गावाला लागून असणारा सिडकोचा पूल कोसळला आहे. या अपघातामध्ये मुळ दादरपाडचा व सध्या डाऊरनगर येथे राहणारा दिपक काशीकर या या तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

या तरुणाला जेएनपीटी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते पण त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे डोंगरी, फुंडे आणि पाणजे या तीन गावांचा उरण शहराशी असणारा प्रमुख संपर्क तुटला आहे. सिडकोच्या माध्यमातून उरण तालुक्यात विकासकामे सुरू आहेत. या विकासकामाअंतर्गत शहरांचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये रस्ते, वीज, नाले, पाणी यासारख्या सुविधा देण्यात येत आहेत. मात्र ही कामे योग्य पद्धतीने होत नसल्याने त्याचा फटका येथील नागरिकांना बसत आहे.

उरण शहराशी डोंगरी, पाणजे आणि फुंडे या तीन गावांना जोडणार्या मार्गावर अशाच प्रकारे सिडकोच्या माध्यमातून रस्ते बांधण्यात आले आहेत. यातील एका रस्त्यावर काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल आज अचानक कोसळून अपघात झाला आहे. काँक्रीटचा हा पूल अचानक कोसळल्याने येथून दुचाकीवरू जाणारा एक तरुण या कोसळणाऱ्या पुलासोबत खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या अपघाताची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.