सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदल माऊंट लिटेरा स्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के निकाल लागला असुन स्कुलने आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
जिंदल माऊंट लिटेरा झी स्कूलचे ५१ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. यातील सर्वच विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले असुन यामध्ये कु. मंदार अवताडे यांने ९३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रंमाक पटकावला. तर कुमारी कांचन राजपूत हिने ९२.८० टक्के व कु. मित पाटीलने ९२.४० टक्के गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
जिंदाल माऊंट लिटेरा स्कूल मधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्या श्रीमती सविता शर्मा, प्रशासकीय अधिकारी अजय यादव आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.






Be First to Comment