Press "Enter" to skip to content

आईची देखभाल न करणार्‍या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।

85 वर्षीय आईची देखभाल न करणार्‍या मुलाविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक शिंदे (50 रा.ठाणे) यांची 85 वर्षीय आई ही रा.कोयनावेळे हिचा सांभाळ व संरक्षण करणे हे त्याचे कर्तव्य असताना त्याने त्याकडे दुर्लक्ष करून तीचा संपूर्णतः परित्याग करण्याच्या उद्देशाने तिला हालअपेष्टा सहन करण्यासाठी सोडून दिल्यामुळे त्याच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात अधिनियम 2007 चे कलम 24 आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.