Press "Enter" to skip to content

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उरण शिवसेनेतर्फे विकास कामांचे भूमिपूजन

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।

शिवसेनेचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे याच्या खासदार निधीतून विविध कामे मंजूर करण्यात आली यामध्ये उरण कोळीवाडा येथे गणेश विसर्जन घाट बांधणे व बोरीपाखडी येथे स्मशानभूमी शेजारी असलेल्या चोप्याचे नूतनीकरण करण्याचे (घाट) बांधणे या कामांचा समावेश आहे.

मंगळवार दिनांक १३/४/२०२१ रोजी गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर शिवसेनेच्या वतीने उरण मध्ये या विकास कामांचे भूमिपूजन सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर उपजिल्हाप्रमुख, नरेश राहाळकर, गटनेते गणेश शिंदे यांच्या हस्ते बोरी व उरण कोळीवाडा येथे संपन्न झाला.

यावेळी नगरसेवक अतुल ठाकूर, समीर मुकरी, नगरसेविका सौ. वर्षा पठारे, सौ.विद्या म्हात्रे, संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, शहर संघटक भूषण घरत, उपशहरप्रमुख कैलास पाटील, चाणजे सरपंच मंगेश थळी, अवजड वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष चेतन म्हात्रे, अल्पसंख्याक सेल चे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम,ग्राहक संरक्षण कक्षचे धीरज बुंधे, विभाग प्रमुख (मोहला-उरण कोळीवाडा), डोमनिक कोळी विभागप्रमुख (बोरी) वैभव करंगुटकर, उपविभाग प्रमुख रवी पाटील, उरण कोळीवाडा शाखाप्रमुख प्रीतम कोळी, बोरी शाखाप्रमुख नंदकुमार पवार, योगेश गोवारी, बोरी येथील संतोष परदेशी, प्रफुल मोरे, संदेश कांबळी,रोहन गुरव, प्रवीण मोरे, जयप्रकाश ठाकूर, कल्पेश खाडे, ध्रुवीत म्हात्रे, अमित म्हात्रे, सचिन म्हात्रे, प्रतीक म्हात्रे तर उरण कोळीवाडा येथील श्री.मोजेस कोळी, श्री.मनवेल कोळी, श्री.स्टिव्हन कोळी, श्री.दर्पण कोळी, श्री.महेश कोळी, श्री.योगेश कोळी, श्री.मयुर कोळी, श्री.देवचंद कोळी, श्री.तुकाराम कोळी, श्री.विवेक कोळी, श्री.राजन कोळी, श्री.मिलिंद कोळी, श्री.चेतन कोळी, श्री.पांडुरंग कोळी, श्री.राकेश कोळी, श्री.कुणाल कोळी, सौ.जयवंती कोळी, सौ.सॅन्ड्रा कोळी, सौ.वेरोनिका कोळी, सौ.पिंकी कोळी, सौ.प्रियांका कोळी, सौ.लिना कोळी तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे उरणकर नागरिक व शिवसैनिक सोशल डिस्टन्स आणि मास्क चा वापर करून उपस्थीत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.