भिषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार
सिटी बेल लाइव्ह /खालापूर( विकी भालेराव)
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर दुचाकी व ट्रक चा अपघात झाल्याने दुचाकीवरील पती-पत्नी हे जागीच ठार झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मूळचे गोवा येथील थॉमस गोम्स व त्यांचे कुटुंब गेली अनेक वर्ष खालापूर तालुक्यातील कलोते या गावी वास्तव्यास होते, शनिवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास थॉमस अंथनी गोम्स(४७) व त्यांची पत्नी ग्लोरी थॉमस गोम्स(४०) हे आपल्या दुचाकीवरून(MH AT 2133)दवाखान्यात निघाले असता मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर माधव बाग नजीक पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू भरधाव ट्रकने गोम्स यांच्या दुचाकीला मागून धक्का दिल्याने दुचाकी रस्त्याच्या खाली पडली तर अपघात झालेला ट्रक दुचाकीवर जाऊन कोसळला, ग्लोरी गोम्स च्या क्लीनर साईटच्या चाकाखाली आल्या तर थॉमस गोम्स हे बाजूला पडले असता त्यांच्या अंगावर ट्रक मधील लोखंडी माल पडला असता ते दोघेही जागीच मयत झाल्याचे समजले, क्रेनच्या सहाय्याने दोघांचेही मृतदेह काढून चौक येथील ग्रामीण आरोग्य केंद्र येथे शव विच्छेदनासाठी नेण्यात आले होते. थॉमस गोम्स हे ख्रिश्चन धर्मिय असल्याने खोपोली येथील त्यांच्या धार्मिक स्मशानभूमीत रविवारी विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर अपघातातील ट्रकचालकाला अपघात होताच पळून गेल्याने त्याच्याविरोधात खालापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे, सदर घटनेचा तपास खालापूर पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.






Be First to Comment