भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचे अभिवादन !
सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी आज नगरपरिषद कार्यालयात अभिवादन केले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेवक राहुल डाळींबकर, बळवंत घुमरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू, रविंद्र लाड, सुदाम म्हसे, लक्ष्मण माने, अशोक भालेराव, शेखर लोहकरे, भाजपचे नेते दिपक बेहेरे, मंदार मेहेंदळे तसेच कार्यालयातील इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.


त्यानंतर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.








Be First to Comment