Press "Enter" to skip to content

जेव्हा दगडं देखील बोलु लागतात… पहा हा स्पेशल रिपोर्ट

सारडे मंचचा निर्जीव दगडात जिवंतपणा आणण्याचा अनोखा प्रयोग

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।

सारडे विकास मंच हे गेली अनेक वर्षे कोमना देवी मंदिर परिसरात झाडे लावून त्याची जपवणूक करीत आलेली आहे. मात्र या परिसरातील निर्जीव असलेल्या दगडांवर अनेक प्रकारची वन्यजीवांची चित्रे काढून त्यांच्यात जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी केला आहे.

हा उपक्रम निश्चितच कौस्तुकास्पद असून अनेकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. सारडे विकास मंचच्या माध्यमातून कोमना देवी परिसरातील डोंगरावर गेली अनेक वर्षे झाडे लावून ती जगविण्याचे काम केले आहे. यामुळे या परिसरातील सौदर्यात भर पडली आहे.

यावर समाधान न मानता सारडे विकास मंचने निर्जीव दिसणाऱ्या दगडांना जिवंतपणा आणण्याचा निर्धार केला. केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साकरण्यास सुरुवात केली.
गेली ३ दिवस भर उन्हात वाघ, हरण, फुलपाखरं व इतर वन्यजीवांचे चित्र साकारत जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये त्यांना यश आले असून यामुळे या परिसरातील सौदर्यात भर पडली आहे. या यशस्वी प्रयत्नाबद्दल येथील परिसरातील जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.

यासाठी मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे राजू मुबंईकर, शिक्षक नेते कौशिक ठाकूर, चित्रकार रवी साटम, रोहित पाटील, रोशन पाटील, संपेश पाटील, अनिल घरत, प्रसाद पाटील आदींनी प्रयत्न केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.