‘कलादर्पण’ संस्थेचा करावके गाण्याचा कार्यक्रम ऑनलाईन
श्रीनिवास काजरेकर
नवीन पनवेल दि. १३ः
संगीतक्षेत्रात कार्यरत असलेल्या “कलादर्पण” या संस्थेचा गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. “ये मोह मोह के धागे” या शीर्षकाने करावके गाण्याचा हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलाकारानी घरातून गाण्याचा आनंद घेतला. प्रसिद्ध संगीतकार विजय मनोहर यांनी कार्यक्रमाचे संकलन व तंत्रसहाय्य केले. त्याना एॅड. अतुल जोशी यानी सहकार्य केले.
श्रुती सिंग, डॉ. शिल्पा वैशंपायन, डॉ. अंजली टकले, डॉ. चित्तरंजन, शिल्पा व अनुष्का भिडे, भारती देशपांडे, प्रसाद जोशी, रेणुका दलाल आदी कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक मोहन हिन्दुपूर यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
“कलादर्पण” या संस्थेच्या माध्यमातून आम्हा होतकरू कलाकाराना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या प्रतिष्ठीत संस्थेच्या माध्यमातून आम्हा कलाकाराना गाण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे.
रेणुका दलाल, गायिका







Be First to Comment