Press "Enter" to skip to content

उरणमधील शासकीय अधिकारी, व्यापारी व डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

कोरोना कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव आज सर्वत्र होताना दिसत आहे. आमजनतेबरोबर शासकीय अधिकारी, व्यापारी व डॉक्टरसुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकू लागले आहेत.
उरणमधील कोरोना विषाणूचा प्रसार शहराबरोबर गावोगावी झाला आहे. त्यामुळे दररोज कोरोना पॉझिटीव्हचा आकडा वाढताना दिसत आहे. यामुळे उरणच्या जनतेत भितीचे वातावरण पसरले आहे.
ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे, असे शासकीय अधिकारी वर्ग व उरणमधील सुप्रसिद्ध डॉक्टर मंडळी, व्यापारी कोरोनाच्या विळख्यात अडकू लागली आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व जनतेत भितीचे सावट पसरले आहे. आमजनतेबरोबर शासकीय अधिकारी वर्ग, व्यापारी व डॉक्टरांना कोरोनाची लागण होऊ लागल्याने चिंतेचा विषय बनला आहे.
उरणमध्ये कोरोना कोविड १९ विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्याची लागण अनेकांना त्यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, डॉक्टर यांचा समावेश आहे. तर काहीजण अजूनही आपले आजार लपवत आहेत तर काही बाहेर परस्पर उपचार घेत असल्याचे समजते. तरी उरणकरांनी कोरोना विषाणू बद्दल जागृत राहावून स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. यासाठी कोरोना पासून दूर रहाण्यासाठी जी काही नियम आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोना आपल्यावर हमी होऊ शकतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.