सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
रसायनी तील खाने आंबिवली येथील प्रशांत खाने यांची रायगड जिल्हा युवक कॉंग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.नियुक्तिचे पत्र रायगड जिल्हा युवक काँग्रेस हेमराज म्हात्रे यांनी त्यांना दिले आहे.या निवडीनंतर प्रशांत खाने यांनी सांगितले की काॅग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिल भारतीय युवक काॅग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास, महाराष्ट्र प्रदेश युवक काॅग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत,रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आपण युवक काॅग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.प्रशांत खाने यांच्या निवडीबद्दल कामगार नेते महेंद्र घरत,माजी सरपंच कृष्णा पारंगे,माजी सरपंच अशोक मुंढे,सागर सुखदरे,काॅग्रेस आयचे तालुकाध्यक्ष नाना म्हात्रे,युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड,सागर जोशी, मयुरेश खाने,पंकज खाने, मिलिंद खाने आदींसह रसायनी परीसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






Be First to Comment