Press "Enter" to skip to content

उरणचे आमदार महेश बालदी कोरोना पॉजेटीव्ह

आमदार महेश बालदी यांच्यावर मुबंईतील दवाखान्यात उपचार सुरू

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।

राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाःकार माजवला आहे. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. उरणमध्येही याचा प्रत्यय येत आहे. आमदार महेश बालदी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. यावर्षी ही मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाःकार माजवला आहे. उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शनिवार व रविवार या दोन दिवशी लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उरण शहरात व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आमदार बालदी यांची प्रकृती उत्तम असून मुबंईतील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.