Press "Enter" to skip to content

प्राथमिक आरोग्य केंद्र गडब ला सलग  दुसऱ्यांदा” कायाकल्प “प्रोत्साहन पुरस्कार

सिटी बेल । पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र (NHM ) सार्वजनिक  आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन (संकल्प निरोगी महाराष्ट्राचा ) अंतर्गत रायगड जिल्हा परिषद अलिबाग (आरोग्य विभाग ) मार्फत जिल्हास्तरीय ‘ ” कायाकल्प  पुरस्कार ” सन -२०१ ९ – सन -२०२० करिता जाहीर करण्यात आला . स्वच्छ सुंदर भारत अभियान ” कायाकल्प कार्यक्रमांतर्गत सुरक्षित व हरित आरोग्य संस्था त्यांचे बळकटीकरण करुन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन – 2019-2020 साठी प्राथमिक आरोग्य केंद्र गडब् यांना जिल्हा स्तरीय ” प्रोत्साहन” पुरस्कार देवून नुकतेच गौरविण्यात आले .

 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सदर सन्मान करण्यात आला. या यशात प्राथमिक आरोग्य केंद्र गडबचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गांगुर्डे, आरोग्य सहाय्यीका एस. पी. पाटील,आरोग्य सहाय्यक शिर्के ,तुकाराम मोकल, आर.एल.पिंगळे , एस.के. मगर, अरुणा पाटील व आरोग्य विभाग कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे.

या सर्व टीमच्या आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.